जळगाव : गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळलेला तरुण फटवर पडला. त्यानंतर जमिनीवर आपटल्याने जखमी झाला. या जीवघेण्या संकटातून हा तरुण सुदैवाने वाचला मात्र त्याने मृत्यूचा थरार अनुभवला. ही घटना सोमवार, २५ रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. फरदीनखान सादीकखान (वय २२, रा. दूध फेडरेशन, शिवाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, फरदीन हा त्याच्या काही मित्रांसमवेत गोताणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानावर कामानिमित्त आले होते. त्यानंतर गॅलरीमध्ये असताना अचानक फरदीनखान हा बाली कोसळता. तो एका विक्रेत्याने लावलेल्या फटवर पडला. त्यानंतर जमीनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला इजा होऊन रतरत्राव झाला. अनेक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तरुणाची काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते तटस्थ राहिले. ही बाब लक्षात येताच काँग्रेसचे पदाधिकारी परवेज पठाण, योगेश माळी, एजाज पिंजारी, पप्पू चहावाला. अमीर मलीक या तरुणांनी जखमीकडे धाव घेतली. रुग्णवाहिकेसाठी फोन केले. मात्र फोन कोणी रिसीव्ह केला नाही. त्यानंतर एका रिक्षामध्ये जखमीला टाकून तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.
ही माहिती कळताच फरदीन हिच्या तहान बहिणीने रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली, डॉक्टरांनी जखमी फरदीन याच्या डोक्याला सात ते आठ टाके टाकून त्याचा रक्तस्त्राव थांबविला त्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मी बाहेर जावून येतो. असे सांगून फरदीन हा घराबाहेर पडला होता, असे त्याच्या बहिणीने सांगितले. फरदीन याचे देव बलवत्तर म्हणून तो या दुर्घटनेतून बचावला, अशी भावना उमटली. त्याच्या एका पायाला जबर दुखापत झाली असून कंबरेलाही इजा झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
गोलाणी मार्केट प्रामुख्याने मोबाईल, प्रिटींग, पादत्राणे, तसेच संगणक याची अनेक दुकाने आहेत. दररोज शेकडो लोकांची येथे वर्दळ असते. जिन्याच्या पायऱ्या या घासून चिकन झालेल्या आहेत. जिना चढताना किंवा उतरताना अनेक जण घसरुन तोल जात असतो. यामुळे लहान मोठी दुखापत काहींना होते. हे काम दुरुस्तीवर आले आहे. मात्र देखभाल करण्याकडे यंत्रणेची अनास्था आहे, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे. चार मजल्यावर नित्य वर्दळ असते. मार्केटमधील जिने जीर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते. तर अनेक ठिकाणी विद्युत वाघरी लोंबकळत आहेत. केव्हाही शॉकसर्किट होऊन आगीता भीती काही गाळेधारकांनी व्यक्त केली. याअनुषंगाने मनपा प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून दुरुस्ती तसेच देखभालच्या कामाता सुरुवात करावा, अशी भावना गाळेधारकांमधून व्यक्त झाली.
लोखंडी रॅलीग काढून सिमेंटची पडदी लावणार
गोलाणी मार्केटमधील जिन्यांसह पॅसेजच्या काठावर लावलेल्या लोखंडी रेलींग या सडलेल्या आहेत. या सर्व रेलींग काढून तेथे सिमेंटची पडदी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी गोलाणी मार्केटच्या पॅसेजसह जिन्यांचे मोजमाप करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यास मंजुरी घेऊन तीन ते चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन करू.
– मनीष अमृतकर, शहर अभियंता, महापालिका, जळगाव.