---Advertisement---

Jalgaon Accident News : महिलेसह दुचाकीला उडवलं अन् कार झाली पलटी

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील वावडदा चौफुलीवर एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. सुमनबाई भिका राजपूत असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण रविवार, ११  रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमधून अपघात कसा झाला हे दिसून येत आहे.

तालुक्यातील वावडदा चौफुलीवर सुमनबाई भिका राजपूत ही महिला डोक्यावर भांडं घेऊन रस्ता ओलांडत होत्या. रस्ता पूर्ण खाली होता. एक-दोन जण रस्त्यावरून वावरत होते. तितक्यात एक बाईक आली.

ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक कार समोरून आली. ही कार अनियंत्रित झाली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमनबाईंना या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की सुमनबाई फुटबॉल सारख्या उडाल्या आणि खाली कोसळल्या. या अपघाताना नंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या भीषण अपघातात सुमनबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment