जळगाव : भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या दुचाकीला धडकल्याने एक जण जखमी झाला. हि दुर्घटना असोदा शिवारात रविवार , २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण विठ्ठल भारंबे (वय ४२, रा. आसोदा ता. जळगाव ) हे या अपघात जखमी झाले आहेत.
आसोदा शिवारात भूषण अरुण भारंबे हे रस्त्याच्या कडेला दुचाकी (एमएच १९ डीएक्स ८१९५) घेऊन थांबले होते. याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात उभ्या दुचाकीवर मागे बसलेले अरुण विठ्ठल भारंबे हे जखमी झाले.
याप्रकरणी भूषण भारंबे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहेत.