Jalgaon Accident : मुक्ताईनगरजवळील कोथळी येथे नादुरुस्त ट्रकला लक्झरी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात २ जण ठार तर ३२ प्रवाशी जखमी झाले. ही घटना बुधवारी पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर कोथळी फाट्यालगत पुलावर घडली. अपघातग्रस्त लक्झरी ही सिहोरी ट्रॅव्हल्स कंपनीची असून, सुरत येथून बुलढाणा जात होती. अपघातात जखमी बहुतांश प्रवाशी बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. या अपघातात चालक देवीलाल पन्नालाल तोहार (वय ३८, रा. सुरत) आणि वाहक भगवतीलाल रेवा शंकर (वय २५, रा. उदयपूर, राजेस्थान) हे जागीच ठार झाले.
हे आहेत जखमी
जखमी ३२ प्रवाशांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, चिखली तालुक्यातील प्रवाशांसह सुरत येथील प्रवाशी आहेत. जखमीमध्ये लता शालिग्राम देवधामे (वय ४९, रा. वरवंड, जि. बुलढाणा), शालिग्राम रामराव देवधामे (वय ६०, रा. वरखंड, जि. बुलढाणा), ऋषिकेश शालिग्राम देवधामे (वय ३०, रा. वरखंड, जि. बुलढाणा), जयसिंग शिरसाठ (वय ७०, रा. दादुलगव्हाण, मेहकर), राधाबाई जयसिंग शिरसाठ (वय ६०, रा. दादुलगव्हाण, मेहकर), आनंदा जंगलू शिरसाठ (वय २४, रा. दादुलगव्हाण, मेहकर), गजमल हिंमतराव आढाव (वय ४२, रा. लासुरा, जि. बुलढाणा), वर्षा गजमल आढाव (वय ४२, रा. लासुरा, जि. बुलढाणा) मो. अफरोज मो. युनुस (वय ३९, रा. रोहीणखेड, जि. बुलढाणा), कैलास धनराज गुजर (वय ५२, रा. रोहीणखेड, जि. बुलढाणा), सलीमा बी शेख सुपडू (वय ४५, रा. ढोणगा व. सानिया परविन शेख फिरोज (वय १९, रा. ढोणगाव), जयश्री विजय मोरे (वय २०, रा. बंडारी, सोदखेड), रामेश्वर आनंदा काळे (वय ४२), रा. शेणगाव हिंगोली, अनुमुद्रा रामेश्वर काळे (वय २४, रा. काहकर, जि. बुलढाणा), अष्टविनायक रामेश्वर काळे (वय ८ वर्षे, रा. काहकर, जि. बुलढाणा), आवेश शहा बशीर शहा (वय १६, रा. मोताळा, जि. बुलढाणा), जयनूर बी हमीद शहा (वय ६०, रा. मोताळा, जि. बुलढाणा), बब्बू शहा रहेमान शहा (वय ५७, रा. बुलढाणा), गोविंदा अंबादास गुंड (वय ३०, रा. चिखली), उषाबाई संतोष तायडे (वय ५९, रा. रुईखेड मायंबा, जि. बुलढाणा), उदय देविदास शेळके (वय ४१, रा.सारोळा, पि.), शेख फिरोज मुस्ताक (वय ४२. रा. सुरत), शबाना बी शे. फिरोज (वय ३६ रा. सुरत), सानिया परवीन (वय २०, रा. बुलढाणा), आदिल शेख बशीर (वय १७, रा. बुलढाणा), कल्याणी गजानन तायडे (वय ७ वर्षे, बुलढाणा), इशिता राजेश वानखेडे (वय १०), आराध्या राजेश वानखेडे (वय ६ वर्ष), समाधान भीमराव बोरकर (वय ३३) यांचा समावेश आहे.
सुरत येथून मेहकर बुलढाणासाठी निघालेत्या यासिहोर ट्रॅव्हल्सचा क्रमांक एआर २० ९५९५ हिने महामार्गावर कोथळी ते सालबर्डी फाटा दरम्यानच्या ओव्हर ब्रिजवर साईड ट्रकला उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक आरजे ०९ जीबी ३२४९) हिला मागून जोरदार धडक दिली
जोरदार धडकमुळे ट्रॅव्हल्सची कॅबिन ट्रकच्या एका बाजूने आठ ते दहा फूट घुसली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली तर कोथळी, सलबर्डी आणि मुक्ताईनगर येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. अपघात इतका भीषण होता की. लक्झरी बसचा दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि खासगी वाहनातून जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले. गंभीर जखमी रुग्णांना जळगावा वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले तर काही जखमींना सोयीनुसार बुलढाणा जिल्ह्यात हालविण्यात आले आहे.