जळगाव विमानतळावर प्रशिक्षण विमान धावपट्टीवरून घसरले

जळगाव : जळगाव विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचे विमान धावपट्टीवरून घसरले. प्रशिक्षण सुरू असताना आज बुधवारी लँडिंग करताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमान कंट्रोल करता आले नाही.

त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कसार यांनी दिली.

जळगाव विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचे विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकाला शिकवत असताना अचानक धावपट्टीवरून घसरले. आज बुधवारी प्रशिक्षणार्थी जळगाव विमानतळावर विमान लँडिंग करताना विमान अचानक धावपट्टीवरून घसरले घसरले.

दरम्यान, यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सोपान कसार यांनी दिली आहे.