तरुण भारत लाईव्ह । जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज २८ रोजी मतदान होत आहे. दरम्यान शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये बोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून राडा झाल्याने केंद्रावरील तणाव काही काळ वाढला होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरणातील तणाव निवळला.
या संदर्भात संबंधित अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले कि, या मतदारांची नावे यादीत आहेत. हरकत घेण्याच्या मुदतीत कोणीही हरकत घेतली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. तरीही रितसर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते तक्रार करू शकतात.