Jalgaon : येथील श्रीराम मंदिर संस्थानातर्फे उद्या मंगळवार, १६ ते २६ जानेवारी या कालावधीत अयोध्या सप्ताह आनंद सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ जानेवारीस सांयकाळी ७ वाजता संस्कार भारतीतर्फे अभंग रामरायांचे हा कार्यक्रम होईल. १७ व १८ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत श्रीराम मंदिराचे उत्तराधिकारी श्रीराम महाराज जोशी हे श्री यजुर्वेद संहिता पारायण सादर करतील. दुपारी ४ वाजता राष्ट्रसेविका समितीतर्फे भजन सेवा सादर होईल. १९ रोजी सायंकाळी ७ वाजता अयोध्या कारसेवा मंतरलेले दिवस या विषयावर उदय भालेराव यांचे बौध्दिक होईल. २० जानेवारीस सायंकाळी ७ वाजता अयोध्या कारसेवा एक आनंदानुभव या विषयावर कारसेवक मुकूंद धर्माधिकारी यांचे प्रवचन होईल.
२१ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत श्रीराम रक्ष्ाा स्तोत्र, सुरभी महिला मंडळातर्फे असंख्य दीप्रज्वलन व आरती होईल. सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ विधीज्ञ कारसेवक सुशील अत्रे यांचे अयोध्या श्रीराम मंदिर प्रवास यावर व्याख्यान होईल. यावेळी जळगावातील कारसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
२२ जानेवारीस पहाटे ५ ते ८ काकडा भजन, काकडा आरती, प्रभु श्रीरामचंद्रांची पुजा- अभिषेक, मंगलारती, विष्णूसहस्त्रनाम पठण, प्रभ श्रीरामचंद्रांचे आराध्य दैवत भगवान श्री शंकरजी यांना रूद्राभिषेक, श्री. सद्गुरू अप्पा महाराजांना श्रीक्ष्ोत्र अयोध्या येथील श्री रामानुज सांप्रदायातील थोर साधू सत्पुरुष श्रीश्री १००८ रामानंद स्वामी यांचेकडून प्रसाद म्हणून मिळालेली प्रासादिक चैतन्यमय प्रभु रामरायांच्या उत्सवमुर्तीस पंचामृताभिषेक, मंगलारती, दुपारी ११ ते १ या वेळत सामूहिक श्रीराम रक्ष्ाा स्तोत्रपठण, श्रीराम नामजप भजन, कीर्तन व महाआरती. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत हरीपाठ, भजन, धुपारती. सायंकाळी ७ वाजता शहरातील ब्रह्मवृंद मंडळींचा शांतीपाठ, वेदमंत्रघोष आदी कार्यक्रम होतील.
२६ जानेवारीस सकाळी ९ वाजता भारत ७५ वा प्रजासत्ताकदिनानिमित्त समस्त भारतीयांच्या कल्याणार्थ श्री सत्यनारायण पूजन व कथा. वक्ते नंदू शुक्ल गुरूजी तर यजमान श्रीराम जोशी असतील. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त मंगेश महाराज जोशी, भरतदादा अमळकर, भालचंद्र पाटील,ॲड. सुशिल अत्रे, शिवाजी भोईटे, दुर्गादास नेवे, विवेक पुंड यांनी केले आहे.