---Advertisement---

Jalgaon News : वीज अंगावर पडून मुलाचा मृत्यू, धानवड शिवारात दुर्घटना

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील धानवड शिवारात ढगाळ वातावरण होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. शेतशिवारात वीज अंगावर पडल्याने नातवाचा मृत्यू झाला. तर त्याचे आजोबा गंभीररीत्या जखमी झाले. अंकुश विलास राठोड (वय १५, रा. धानवड, ता. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

नातू अंकुश राठोड आणि त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड असे दोघे धानवड जवळच्या भवानी खोरा रस्त्यावरील शेतात होते. सोमवारी (३१ मार्च) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळून अंकुश राठोड याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शिवाजी राठोड हे जखमी झाले.

हा प्रकार लक्षात येताच शिवारातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नातवासह आजोबाला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती डॉक्टरांनी अंकुश या मुलास मृत घोषित केले. जखमी शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना धानवड येथे धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार विकास सातदिवे हे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment