---Advertisement---

jalgaon crime: कुटुंबिय झोपेत, पोत, रोकड घेत चोरटा पसार

by team
---Advertisement---

जळगाव : कुटुंबातील सदस्य घरात झोपले असताना सोन्याची पोत, रोकड, मोबाईल असा सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल घेत चोरटा पसार झाल्याची घटना मुंदडा मळा, पिंप्राळा येथे बुधवार 4 रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून गुरुवार 5 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

केशव गणेश मंजाटे (33) हे मुंदडा मळा, पिंप्राळा येथे राहतात. मंजाटे व सदस्य घरात झोपले असताना चोरट्याने आतून लावलेली दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. मुद्देमालाचा त्यानंतर शोध घेतला. सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत किमत 15 हजार,  3 हजार किमतीचा मोबाइल, 1500 रूपयाचा जुना मोबाइल, 500 किमतीचा जीओ मोबाइल, 20 हजाराची रोकड असा एकूण 40 हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला.  पोनि शिल्पा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment