जळगाव : शहरातील नेरीनाका परीरसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने मंगळव्ारी संध्याकाळी अचानक छापा टाकत एक लाख 67 हजारांच्या रोकडसह तीन मोटारसायकली जप्त केल्या. तसेच 27 जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर खळबळ उडाली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचने वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. शहरातील नेरीनाका परिसरात गज्या भाऊंचा जुगार अड्डा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छापा टाकताच पळापळ झाली. 27 जुगारींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्या ताब्यातून मोबाईल आणि खेळातील रोख रक्कम जप्त करण्यात आली. 18 मोबाईल आणि 1 लाख 67 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
यांच्यावर झाली कारवाई
सुनील गबा पाटील (50, पाचोरा), संदीप रामा गोपाल (28, रा. वावडदा), पंढरी बाबुराव कोळी (30, रा. भादली), जगदीश सोमनाथ हळवे (38, रा. जुने जळगाव), स्वप्निल शंकर हवलदार (33, रा. मेहरुण), गजानन रतन चौधरी (50, रा. तुकाराम वाडी), केशव एकनाथ भोळे (65, जुना खेडी रोड), नामदेव मानसिंग पाटील (48, रा. मन्यारखेडा), नंदकिशोर रतन चौधरी (43, रा. तुकाराम वाडी), धनंजय दिनेश कंडारे (27, रा. शनिपेठ), नितीन भास्कर गायकवाड (39, रा. जुने जळगाव), गणेश तुकाराम पाटील (36, रा. गुरुकुल कॉलनी), रवी कमलाकर बाविस्कर (36, रा. वाल्मीक नगर), आकाश प्रभाकर पाटील (30, रा. जुना खेडी रोड), पिंटू सुधाकर भोई (37, रा. टहाळकी, ता. धरणगाव), इब्राहिम अकबर सय्यद (60, मासूमवाडी), इम्रान शेख सय्यद (44, रा. मासूमवाडी), मनोज रमेश शिनकर (30, रा. मारुती पेठ), चंद्रकांत शंकर पाटील (60, रा. मन्यारखेडा), रमेश पुंडलिक सोनार (71, गिरणा टाकी परिसर), मुकेश शांताराम पाटील (43, रा. रामेश्वर कॉलनी), भरत दिलीप बाविस्कर (38, रा. लक्ष्मी नगर), अरुण कौतिक चौधरी (47, रा. सुप्रीम कॉलनी), मयूर रामचंद्र कोल्हे (34, रा. विठ्ठल पेठ), दत्तू भिका सोनवणे (68, रा. कांचन नगर), नरेंद्र एकनाथ ठाकरे (33, रा. मेस्को माता नगर), सीताराम ज्योतीराम सोनवणे (40, रा. तुकाराम वाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.