जळगाव : बंद केलेल्या शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकान असलेले साबणे, तेल- तुपाचे डबे, तुरडाळ, पॅराशूट तेल, बिस्कीट तसेच रोकड असा सुमारे 22 हजार 490 रूपयांचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाल्याची घटना शहरात शिवाजीनगरातील गेंदालाल मिल परिसरातील वासुदेव किराणा दुकान येथे गुरुवार, 5 रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वासुदेव टिकुमल हनंदी (59) हे कवरनगर सिंधी कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांचे शिवाजीनगरात गेंदालाल मिल गाळा नं.1 बिल्डीग नं. 56 येथे वासुदेव किराणा नावाचे दुकान आहे.
गुरुवारी सकाळी या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. हनंदी यांच्या तक्रारीनुसार 4200 रुपये रोख, रिन साबणाची 1 पेटी किमत 700 रुपये, टीपटॉप साबणाची 1 पेटी किमत 350 रु , सारस साबणाची 1 पेटी 350 रु, अशोका साबणाची 1 पेटी किमत 350 रु.,धुलाई साबण 1 पेटी रु.350, व्हील साबणाची 1 पेटी रू.450, लाईफ बॉय साबण 1 पेटी रु.800,लक्स साबण 1 पेटी रु.800, संतुर साबण 1 पेटी 800 रु.,डेटॉल साबण 1 पेटी 240 रु,नं.1 साबण 1 पेटी रु 600, तुरदाळ 30 किलो वजनाचा कट्टा रु.5400, खुले तेल 15 किलो रू. 1500, डालडा तुपाचा डबा रु. 1600, गुड्डे बिस्किट रु.750, टेव्टीं टेव्टी बिस्कीट एक कार्टून रु. 750, रिचा सोया तेल रु. 1 हजार, पॅराशुट खोबरेतेल बाटल्या रू. 1500 असा एकूण 22 हजार 490 रुपयांचा किराणा माल घेवून चोरटे पसार झाले.