जळगाव ः किरकोळ वाद उफाळल्यानंतर तरुणावर चॉपर मारून हल्ला करण्यात आल्याची घटना गेंदालाल मिल परीसरात शनी मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमीरखान रहिमखान (27, रा.गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण परीवारासह वास्तव्याला आहे.
खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. काही दिवसांपूर्वी सचिन जगन्नाथ शिंपी (22) याने अमिरखान याच्याकडे जेवण करण्यासाठी पैसे मागितले होते. अमीरने ते दिले नाही. त्याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. शुक्रवार, 28 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील शनीमंदीर परिसरात अमिरखान रहिमखान याला सचिन शिंपी आणि त्याच्यासोबत सिध्दार्थ अरूण सुर्यवंशी हे भेटले. त्यावेळी अमिरने सचिनकडे दुर्लक्ष करत सिद्धार्थकडे बोलणे सुरू केले. यामुळे चिडून सचिन शिंपी याने हातातील चॉपरने पोटावर वार करून अमीरला गंभीर जखमी केले. तसेच सोबत असलेला सिध्दार्थ अरूण सुर्यवंशी याने जखमी अमीरला कोणतीही मदत न करता दोघे पसार झाले. याप्रकरणी जखमी झालेल्या अमिरखान याने शनिवार, 30 सप्टेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिलयानंतर रात्री 9 वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.