जळगाव मधील इंद्रप्रस्थनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.खासगी क्लाससाठी येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करुन नेत मारहाण करण्याची घटना समोर आली आहे.प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मुलीच्या नात्यातील तरुण व त्याच्या शाळकरी मित्रांनी विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत जखमी केले.
अव्हाणे येथील सुमेध सुरेश सपकाळे हा विद्यार्थी गावातीलच स्वामी समर्थ विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे.त्याने जळगावात इंद्रप्रस्थनगरात खासगी क्लासमध्येही प्रवेश घेतलेला आहे.मागील काही महिन्यांपासून त्याचे अव्हाणे ते जळगाव असा प्रवास सुरु होता.त्याच्याच वर्गात शिक्षण घेणारा सुनील एकशिंगे याला नातेवाईक मुलीसोबत सुमेधचे प्रेम संबध असल्याचा संशय होता.सकाळी सुमेध सपकाळे हा क्लास संपल्यावर घरी जाण्यासाठी निघाला होता.त्यावेळी शंभर फुटी रोडवर एका ऑटो रिक्षातून आलेल्या विजय शिंदे याने सुमेधला जबरदस्ती रिक्षात बसवुन सागरमल शाळेच्या मागील बाजुस नेले.मारहाण करत रक्तबंबाळ करण्यात आले.सुमेधने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.