---Advertisement---

jalgaon crime: महिलेच्या गळ्यातून पोत तोडून भामटे पसार

by team
---Advertisement---

पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत तोडून चोरटे दुचाकीने पसार झाल्याची घटना शुक्रवार  13 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास खोटेनगर ते गुजराल पेट्रोलपंप दरम्यान महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली. सीमा युवराज पाटील (40) या गृहिणी प्लॉट नं. 3 दत्त रेसिडेन्सी खोटेनगर याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जेवण केल्यानंतर त्या शतपाऊली करण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्या खोटेनगर ते गुजराल पंपाकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरुन पायी चालत होत्या. मॉ प्लॉयवूड दुकानासमोरुन जात असताना अचानक त्यांच्या मागवून एका काळ्या रंगाची दुचाकीवरुन दोन अनोळखी इसम आले. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने तोडू लागले. महिलेने आरडाओरड केली, मात्र दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातून पोत ओरबडली आणि दुचाकीने सुसाट वेगात पसार झाले.

प्रकार कळताच रात्री  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. एलसीबीचे पोनि किसन नजन पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोनि महेश शर्मा यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही भेट दिली. 15 ग्रॅम वजनाची मंगलपोत सुमारे 30 हजार किमतीची चोरी प्रकरणी तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि अनंत अहिरे करत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment