jalgaon crime: रेल मारुती मंदिरात तब्बल इतक्या रुयांची झाली चोरी

चोपडा : शहरातील धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरात 50 हजार रुपयांच्या पितळी वस्तूसह रोकड अज्ञात चोरांनी चोरून नेली. मागील काही दिवसात तीनदा चोरी झाली. अजूनही एकाही चोरीचा तपास लागला नसल्याने मंदिर व्यवस्थापक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.  रेल मारुती मंदिरावर  असलेले अम्प्लिफायर (12-13 हजार रु.) 2 दानपेट्या तोडून त्यातील रोकड 2 ते 2;30 हजार रुपये लंपास करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मारुती मंदिरावरील मूर्ती जवळून एक (पितळी 3-4 किलो) किलोची  घंटा छोटे-मोठे पट्टे चोरुन नेले. शनीमंदिरातील तेलाची घागर आणि पितळी पट्टा चोरीला गेला आहे. या दोघांचे वजन 7-8 किलो आहे.

तसेच मंदिराच्या बाजुच्या खोलीतील तांब्याची पंचआरती, ताट, मारोतीच्या दोन गदा आदी किरकोळ वस्तूसुध्दा चोरीला गेल्या आहेत. अशाप्रकारे एकूण अंदाजे 50 हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. पूर्वीसुदा मंदिरात 3 वेळा चोरी झालेल्या आहेत. त्यांची तक्रार देवूनसुध्दा कोणताही तपास लागला नाही किंवा वस्तू मिळाल्या नाहीत. सखोल चौकशी करून चोरांना पकडण्यात यावे व मुद्देमाल मिळवून द्यावा, अशी विनंती मंदिर व्यवस्थापनाने केली आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शक्य होणार असेल तर जुनी बंद पडलेली पोलीस चौकी मंदिराशेजारी पूर्ववत सुरू करण्यात यावी, असेही ट्रस्टींनी नमूद केले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.