जळगाव: सार्वजनिक जागेवरुन दुचाकी लांबविण्यात तसेच कुलूपबंद घर लुटण्यात चोरटे माहिर आहेतच, पण घरासमोरुन तसेच अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली दुचाकी लांबविण्यातदेखील ते पटाईत आहेत. त्यांना ना कोणाचा धाक ना कोणाची भिती, अशा थाटात शहरात दुचाकी, चार चाकी वाहन चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. शहरातील फुले मार्केट परिसरातील चैतन्य मेडीकल समोरुन चोरट्यांनी मंगळवार १२ रोजी दिवसा आणखी एक दुचाकी लांबविली.
सुरेश बाबुराव जाधव (५०) हे व्यावसायिक असून त्यांचे शहरातील रामनगर शिरसोली नाका येथे किराणा दुकान आहे. किराणाच्या वस्तू घेण्यासाठी ते बुधवारी त्यांच्या मालकीची दुचाकी एमएच १९ एयू १०७१ ने दुपारी गावात आले. फुले मार्केट परिसरात चैतन्य मेडीकलसमोर दुचाकी लावून ते वस्तू घेण्यासाठी गेले. ४.३० वाजता ते दुचाकी घेण्यास आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करत
आहेत.