जळगाव : कुलूपबंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर किमती वस्तू असा सुमारे 44.550 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना प्रजापत नगरामागील पवननगर परिसरात घडली. हा प्रकार मंगळवार, 3 रोजी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आला.
शहरातील पवनगर प्लॉट नं.10 याठिकाणी छायाबाई भटू बडगुजर (53) तसेच त्यांची मुलगी अनुराधा असे वास्तव्यास आहेत. शुक्रवार, 29 रोजी ते कामानिमित्त घराच्या दरवाज्याला कुलूप लावून गावाला गेले. ही संधी हेरून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील लॉक तोडून दागिने, चांदीच्या मूर्ती, शिक्के, साहित्य असे घेऊन चोरटे पसार झाले. छायाबाई मंगळवार 3 रोजी सकाळी 8.30 वाजता घरी आल्या असता त्यांना कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाटाचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना दिसले.
असा नेला मुद्देमाल
1 हजार किमतीचे दोन ॲंड्रॉॅईड मोबाइल, 20 हजार किमतीचे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली बांगडी, 3 हजार रुपये किमतीचे सव्वा ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, 10 हजार रूपये किमतीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा 2 नग, 3 हजार किमतीचे 1ग्रमॅ वजनाचे सोन्याचे ओम नावाचे पदक, 1 हजार किमतीचे चांदीचे गणपती व महालक्ष्मीचे फोटो असलेले देवाचे 5 शिक्के 50 रू. किमतीचे नाकातील डायमंडची फुली, 2,500 रूपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे डांयमंडचे कानातले टापसे, 1 हजार किमतीचा पेनड्राईव्ह 8 नग, हार्ड डिक्स्ा व लॅपटॉप बॅटरी असा एकूण 44,550 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
घटना कळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि महेश शर्मा, पोउपनि माणीक सपकाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. कडीकोंडा तसेच कपाटाचे लॉक तोडण्याची पध्दत लक्षात घेतली. कुलूपबंद घराचा दिवसा शोध घेवून रात्री घर फोडायचे, हा फंडा चोरट्यानी याठिकाणी अंमलात आणला,असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी छायाबाई बडगुजर यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.