Jalgaon Crime News : दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल व पर्स लंपास

जळगाव :  शहरात श्री गणरायाचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. अशाच प्रकारे गणपती पाहण्यासाठी आलेल्या तरुणीने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ११ हजार रुपयांचा मोबाईल आणि पर्स ठेवली होती. तो मोबाईल आणि पर्स चोरुन नेल्याची घटना १२  रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहरु चौकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सृष्टी अश्विन मोरे ( रा.  गंधर्व कॉलनी, जळगाव)  ही तरुणी तिच्याकडे (एमपी ६८, एमबी ६६३३) क्रमांकाची तिच्या नातेवाईकाच्या नावे असलेली दुचाकी आहे. ती गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी शहरातील गणेश मंडळांमध्ये दर्शन घेण्यासाठी आईसोबत आली होती. तीने दुचाकी नेहरु चौकातील खान्देश मीलच्या रोडवर असलेल्या पार्कींगमध्ये लावलेली होती. सृष्टी मोरे हीने तिच्याजवळ असलेला मोबाईल पर्समध्ये ठेवून ती पर्स दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि ते दोघे गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी निघून गेले.

दर्शन घेवून दोघ मायलेकी ९ वाजेच्या सुमारास दुचाकी लावलेल्या ठिकाणी आल्या असता, त्यांना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पर्स आढळून  आली नाही. तसेच चोरट्याने त्यांच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेला ११ हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. तरुणीने लागलीच शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.