Jalgaon Crime News : बांधकाम व्यावसायीकाला दहा लाखांचा गंडा, फसवणूक कशी झाली?

जळगाव : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायीकाला तब्बल दहा लाख 41 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी भामट्यांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

28 वर्षीय तक्रारदार हे बांधकाम व्यावसायीक आहेत. 28 जून ते 23 जुलै 2023 दरम्यान 8227665094 या क्रमांकावरून तसेच आलोककुमार नामक टेलिग्राम धारकाने प्रीपेड टास्कमध्ये क्रिप्टो करन्सीत जादा गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दहा लाख 41 हजार रुपये वेळोवेळी ऑनलाईन पद्धत्तीने स्वीकारले.

गुंतवणुकीनंतर कुठलाही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहेत.