जळगाव : नशिराबाद गावाजवळील अमृत हॉटेल जवळून एका तरुणाची दुचाकी भरदिवसा चोरून नेली. तर अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकातून पाच जणांच्या खिश्यातून ६४ हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव जितेंद्र पाटील (२६, रा. नशिराबाद ता. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ६ जून रोजी दुपारी १ वाजता त्याची दुचाकी ही गावातील अमृत हॉटेल समोर लावलेले होती. ही दुचाकी अज्ञातानी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रणव पाटील याने दुचाकीचा शोध घेतला मात्र मिळून आली नाही. याबाबत नशीराबाद पोलिसात तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.
अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकात १२ रोजी सायंकाळी ५ वाजता अजय रघुनाथ केले (५६ रा. प्रोफेसर कॉलनी अमळनेर) यांच्यासह रवींद्र मधुकर पाटील, गजानन नाना सूर्यवंशी, गोपीचंद दगडू चौधरी आणि अमोल कैलास महाजन या पाच जणांच्या खिशातून संशयित अमीर शेख अजित शेख (२४ रा. तेली स्कूल जवळ भुसावळ) याने एकूण ६४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घटना लक्षात आल्यानंतर अजय केले यांच्यासह इतरांनी रात्री ९ वाजता अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अमीर शेख अजित शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल