जळगाव : शहरातील जळगाव-भुसावळ महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या प्रेमचंदनगर भागातील एका सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीसममध्ये अज्ञात व्यक्तीने मालकाच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून ऑफिसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व एक मोबाईल असा १ लाख १३ हजार ०१५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहातील जळगाव-भुसावळ महामार्गाजवळील कमल पॅराडाईज हॉटेलच्या मागील बाजुस प्रेमचंदनगर भागातील चेतन पाटील यांचे मालकीचे दुमजली अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या तळमजल्याची रुममध्ये असलेल्या कृष्णकुमार विभूती सिंग याच्या मालकीचे सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीसमध्ये आहे.
ऑफिसमध्ये ते हजर असतांना एका अनोळखी व्यक्तीने ऑफीसचा बंद दरवाजा नॉक केला. दरवाजा उघडला असता अज्ञात व्यक्तीने कृष्णकुमार विभूती सिंग याच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये येवून त्यांना धक्का देवून ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण १ लाख १३, हजार ०१५ किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरि. प्रिया दातीर या करत आहेत.