---Advertisement---

Jalgaon Crime News : तरुणावर चाकू हल्ला, तालुका पोलिसात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : दारुच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर विनाकारण चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या तरुणाच्या हाताला दुखापत झाल्याची घटना सोमवार, २ रोजी रात्री घडली. याबाबत बुधवार, ३ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान भिला पाटील (२६रा. जामोद ता.जि. जळगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवार, २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तो घरी होता. यावेळी गावात राहणारा पंकज उत्तम पाटील याने दारूच्या नशेत येवून विनाकारण शिवीगाळ केली. समाधान पाटील यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेबाबत मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार पंकज उत्तम पाटील रा. जामोद याच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment