जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील जुना खेडी रोडवर एक अल्पवयीन मुलगा हा हातात गावठी पिस्तून घेवून दहशत माजवीत होता. याची माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार धनके यांनी शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोहेकॉ विजय खैरे, विक्की इंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे यांचे पथक बनविले.
या पथकास दि. २९ रोजी दुपारी पिस्तूल घेऊन फिरणारा अल्पवयीन मुलागा आढळून आला. तो पोलीसांना पाहून पळण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात त्यास घेतले. त्याच्याजवळून गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.