---Advertisement---
Jalgaon News : मनसेचे नेते माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला. फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान छापा टाकून पोलिसांनी हे बनावट कॉल सेंटर उध्दवस्त केले आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देश आणि विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी रविवारी ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल. के. फॉर्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी बनावट कॉल सेंटर असल्याचा खुलासा झाला. हे कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी-विदेशी नागरिकांचे लाखो रुपये लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे फॉर्म हाऊसमधून तब्बल 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांच्या या कारवाईनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असं काही सुरु असेल अशी कुणाला कल्पनादेखील नव्हती. फॉर्म हाऊसवर सुरु असणाऱ्या बनावट कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, या प्रकरणात ललित कोल्हे यांच्यावर आणखी कुणाचा वरदहस्त होता का? याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने दुपारी फार्म हाऊसवर ही कारवाई केली.
---Advertisement---