Jalgaon Crime: शहरात सध्या चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशात पुन्हा घरफोडीची घटना समोर आली आहे. शहरातील भोईवाडा परिसरात ही घरफोडी (bhoiwadav robbery news) झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी २ लाख ३० हजारहाचे दागिने लांबविले आहे. बुधवार २ एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला (shani peth police station) अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शनीपेठ पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईवाडा परिसरातील भरत सुभाष पवार यांच्या घरात ही घरफोडी झाली आहे. भरत पवार हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, ते दि. २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान बाहेरगावी असल्याने त्याचे घर बंद होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने ऐवज लंपास केला आहे.
चोरट्यांनी घरातून एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यात सोन्याचा चपलाहार, कानातले टोंगल तसेच सोन्याची मणी असा ऐवज होता. ही घटना बुधवार २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. या प्रकरणी भरत पवार यांनी शनीपेठ पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.