Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष देत महिलेस नऊ लाखांचा घातला गंडा

---Advertisement---

 

Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेस सायबर ठगांनी सुमारे आठ लाख ९३ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन सायबर ठगांवर गुरुवारी (१२ जून) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

४३ वर्षीय महिला चहार्डी (ता. चोपडा) येथे वास्तव्यास असून गृहिणी आहे. १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ या कालावधीत मोहित शर्मा तसेच आशिष भारद्वाज यांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये अधिक नफा आम्ही ग्राहकांना मिळवून देतो, असा बनाव केला. त्यानंतर सुरुवातीला महिलेने गुंतवलेल्या रकमेवर सायबर ठगांनी अधिकच्या नफ्याचा परतावा महिलेस दिला.

कामोडीटी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवित्यास जास्तीचा नफा मिळवून देतो, अशी थाप देत त्यांनी महिलेस वेगवेगळ्या युपीआय, आयडी, बँक खाते यांचे बारकोड दिले. महिलेकडून वेगवेगळ्या कारणासाठी ऑनलाईन पैसे स्वीकारले. त्यानंतर कोणताही परतावा किंवा नफा मिळवून दिला नाही.

फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी (१२ जून) दोन सायबर ठगांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---