जळगाव: जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे.जळगाव जिल्हा परिषदेच्या एकुण 626 जागांसाठी तब्बल 34 हजार 247 अर्ज प्राप्त झाले आहे.त्यामुळे या भरतीत उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे. उमेदवारांच्या दाखल झालेल्या अर्जाच्या माध्यमातून 3 कोटी 45 लाखांचा महसूल जमा झाला आहे.गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेली जि.प.ची भरती प्रक्रीया सुरू झाली असून यात विविध 17 केडरच्या 626 जागांसाठी भरती प्रक्रीया होणार आहे.आयबीपीएस कंपनीकडून ही भरती प्रक्रीया राबविली जात असुन 5 ते 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
मुदतीत 34 हजार अर्ज दाखल झाले आहे. जि.प.त कंत्राटी ग्रामसेवकांची 74 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी 11हजार 837 अर्ज प्राप्त झाले आहे.सर्वात कमी आरोग्य पर्यवेक्षकसाठी 25 अर्ज आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी 42 अर्ज आले आहे. कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यासाठी 131अर्ज प्राप्त झाले आहे. प्रयोग शाळा तंत्रज्ञसाठी 307 अर्ज आले आहेत. आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहे
.यात आरोग्य परिचारीका महिलांसाठी 1033 अर्ज आले असून आरोग्य सेवक पुरूष 132,आरोग्य सेवक पुरूष हंगामी फवारणीक्षेत्र कर्मचारी साठी 4061, औषध निर्माण अधिकारी पदासाठी 1901, प्रयोग शाळा तत्रज्ञसाठी 307,विस्तार अधिकारी कृषीसाठी 394,वरिष्ठ सहाय्यक 2026, वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी 262, कनिष्ठ सहाय्यक लेखासाठी 42,कनिष्ठ सहाय्यक 2314, कनिष्ठ अभियंता 3 हजार 944 स्थापत्य अभियांत्रिकी 3 हजार 727 अर्ज आले आहेत.