जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली…!

---Advertisement---

 

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ लागू केला आहे. सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल जाणवू लागला. शहरात ढग दाटून आले असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.

हवामान विभागाने ३० आणि ३१ मार्चदरम्यान वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्याची परिस्थिती पाहता हा अंदाज अचूक ठरत असल्याचे दिसत आहे. दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले आणि जळगावसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

या बदलासोबतच जोरदार वारेही वाहू लागले, त्यामुळे तापमानात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

आगामी काही तास महत्त्वाचे ठरणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. काही भागांत गारपीटही होऊ शकते. या स्थितीचा शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणतीही आपत्कालीन अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---