जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार दि. ५ रोजी चोपडा येथे जिल्हास्तरीय अविष्कार २०२४ स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.
यात जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमधील ८०० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व स्कूल ऑफ लाईफ सायन्सचे प्रा. डॉ. पी. आर. पुराणिक आदी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये हुम्यानिटीज, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्सचे १०९, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ चे १४६, सायन्सेसचे १२८, अॅग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरीचे ३२, इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे ७८ तसेच मेडिसिन अँड फार्मसीचे ९० असे पोस्टरर्स व मॉडेल्सचे सादरीकरण केले जाणार आहे.
यावेळी स्पर्धेचे स्थानिक सल्लागार समितीप्रमुख व प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील तसेच अविष्कार संयोजन समितीचे प्रमुख व समन्वयक डॉ. व्ही आर. हुसे व डॉ. डी. डी. कर्दपवार आदी उपस्थित होते.