---Advertisement---

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ‘न्यूज’

---Advertisement---

जळगाव : गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा दीडपट अधिक मॉन्सूनचा पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहानमोठ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. परिणामी या वर्षी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहातदेखील जिल्हा टँकरमुक्त (Jalgaon tanker free news) असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१७-१९ च्या कठीण दुष्काळात तब्बल २५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर २०१९ ते २०२२ असे सलग तीन वर्षे सरासरीनुसार समाधानकारक पर्जन्यमान होते. या तीन वर्षांत जळगाव जिल्हा जवळजवळ टँकरमुक्तच होता. त्यानंतर मात्र पुन्हा २०२३-२४ च्या मॉन्सून काळात अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे २०२३ च्या जून ते ऑक्टोबर तसेच मार्च ते जुलै २०२४ पावसाळ्याच्या दरम्यान तब्बल १२५ टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र गत २०२४-२५ दरम्यानच्या मॉन्सूनदरम्यान समाधानकारक मॉन्सून झाला होता. त्यामुळे सद्यःस्थितीत एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात अजूनही जिल्ह्यात प्रकल्प आणि विहिरींची पाणीपातळी बऱ्यापैकी असून कोणत्याही ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी आलेली नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मोठे तीन, मध्यम आणि लघु असे ९६ प्रकल्प आहेत. दरम्यान सद्यःस्थितीत जिल्हा ‘टँकर मुक्त’ असून आतापर्यंत केवळ ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मात्र, जलसाठ्याचा सुरक्षितपणे वापर करणेच सोयीचे ठरणार असून पावसाळ्यातसुद्धा त्यामुळे यंदा पाणीटंचाईवर सहज मात करता येणार आहे.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने भरलेले होते. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. मात्र, जलसाठ्यांची पातळी वेगाने घटत असताना आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी झालेली नाही. ही बाब दिलासादायक आहे.

चार विहिरींचे अधिग्रहण

सद्यःस्थितीत केवळ चारच विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील पाचोऱ्यातील तीन गावांसाठी प्रत्येकी एक, तर चाळीसगावच्या एका गावासाठी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात एक नवीन विंधन विहीर घेतली गेली आहे. अन्य तालुक्यात मात्र टंचाईचे सध्यातरी कुठलेही चित्र दिसून आलेले नाही.

प्रकल्पनिहाय जलसाठा (टक्केवारीत)

हतनूर- ५९.६१, बहुळा- ३०.९६, गिरणा ३३.०१, तोंडापूर- ४१.४९, वाघूर- ८०.३३, अंजनी-३७.२०, सुकी ८२.०३, अभोरा ७५.८८, भोकरबारी ५.६९, मंगरूळ ५२.६०, बोरी- १८.३०, मोर- ७२.५८, मन्याड ४२.१२, अग्नावती ३२.११, हिवरा २७.७३, शेळगाव बॅरेज- २२.९३ एकूण प्रकल्पीय साठा ४६.७३ टक्के आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment