Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताला हातभार लावण्यासाठी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकसभेची उमेदवारी करणार असल्याचे मत जळगावच्या खेडी कढोलीचे रहिवासी व पुणे येथील उद्योजक अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. तरूण भारत लाईव्हच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
गिरणेच्या काठावरील खेडी कढोली गावाचे रहिवासी आहोत. नोकरी निमित्ताने वडील व आजोबा जळगावला राहण्यास होते. १९६२ पासून येथील रहिवासी आहोत. आई पारोळा येथील आहे. उद्योगाकडे थेट वळलो नाही. पुण्यात नोकरी करत असताना माझे व्हिजन क्लिअर झाले की नोकरीपेक्ष्ाा उद्योगात आपण जास्त यशस्वी होऊ शकू. चांगल्या पगाराची नोकरी करून आरामात जीवन जगू शकलो असतो. असे असताना मात्र उद्योगातून आपण चार जणांना रोजगार देऊ शकतो ही जाणिव त्यावेळी मला झाली आणि उद्योगाकडे वळलो. १३ वर्षापुर्वी मी स्वत:चा अभियांत्रिकीत उद्योग सुरू केला. त्यावेळी विविध कंपन्याकडे आपल्या उद्योगाची माहिती दिली. आपले कौशल्य लोकांसमोर मांडले. डेटा सेटर वर अधिक काम केले. त्यावरच व्यवसायाची सुरूवात केली. मॉर्डन जगात जास्त काम व डेटावर होत असते.
भारतातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. काहीतरी करण्याची धमक आहे. जिद्द आहे. त्याच्यावरच भारताचे भविष्य आहे. ती प्रतिभावंत आहेत. त्यांना सपोर्ट केला तर तर ते खचणार नाही.
क्रिकेट मॅचमध्ये सहा बॉलवर सहा चौके किंवा सिक्सर मारलेच पाहिजे असे नाही. कधी कधी शुन्यावरही आऊट होतो. म्हणून क्रिकेट खेळण्याचे सोडून देता येत नाही. त्यामुळे अपयशाचा बाऊ न करता पुन्हा प्रयत्न करावा. व्यवसायात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. सातत्य ठेवले तर यशाकडे नक्कीच जातील.
तरुणांनी राजकारण यावे. त्याच्याकडे कौशल्य आहे. उद्योजकांचा अनुभव मोठा असतो. त्यांचा सबंध अनेकांशी येत असतो. ज्यांच्याकडे स्वत:चे यश आहे. ज्यांनी स्वत:ला प्रस्थापीत केले आहे. ज्यांच्यात समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे अशा सुशिक्ष्ाित युवकांनी राजकारणात यावे.
यामुळे राजकारणाचा स्तर उंचावेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा स्तर फार वर नेला आहे. आज स्थिर सरकार येत नव्हते. मोंदींकडे ते व्हिजन व धमक असल्याने बहुमत येताच त्यांनी स्थिर सरकार दिले. प्रतिभाशाली, उद्योजक युवाशक्तीने जरूर राजकारणात यावे. कारण त्यांच्या व्यावसायाचा अनुभव देशातील युवकांना रोजगार देण्यास उपयुक्त ठरू शकेल. युवकांच्या हाताला रोजगार मिळाला तर आपोआपच काही अपगोष्टी बंद होतील असा विश्वास अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.
खचून जाऊ नये
युवक रोजगारासाठी प्रयत्न करत असतात तर काही उद्योगक्ष्ोत्राकडेही येतात. आज स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे उतारचढाव येत असतात. त्यामुळे युवकांनी खचुन न जाता काम करत राहावे. उद्योजक घडविण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती समाजाची आणि त्यांच्या पालकांची.पालकांनी जर मुलांना सपोर्ट केला तर मुलांना जी निराशा येते तीची तिव्रता कमी होण्यास मदत होते. समाजानेही सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे उद्योजक अविनाश पाटील यांनी सांगीतले.
मोदींचे व्हिजन पुढे नेण्यासाठी माझी उमेदवारी
मोदीचे देशाच्या विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मोदींच्या पक्ष्ाांकडून अर्थात भारतीय जनता पार्टी कडून लोकसभा लढविण्याचा मनोदय आहे. उच्च शिक्ष्ाित व स्वयंसेवक असल्याने समाजामध्ये जाऊन काम करण्याची आवड आहे. मी कायद्याचा पदवीधर असल्याने मला त्यात मला आवड आहे. कायदा तयार करण्यात रस आहे. हे काम लोकसभेत होत असते. पॉलिसी मेकिंगमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी मनोदय असल्याचेही अविनाश पाटील यांनी सांगीतले.