---Advertisement---

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

---Advertisement---

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणींतर्गत पिकांची नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी 25 एप्रिलपर्यंत पिकांची नोंदणी करून फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात फळ पीक विमा योजनेंतर्गत ई-पीक पाहणी व नोंदणी केली जात आहे. या नोंदणीसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत आहे. केंद्र व राज्य शासनांतर्गत जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणींतर्गत पिकांची नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांचे विमा अर्ज पात्र राहणार नसून ते मुदतीअंती बाद ठरविले जाणार आहेत.

हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत नोंदणी नसल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पीक नुकसान भरपाईच्या रकमेचा लाभ मिळू शकणार नसल्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

25 एप्रिलपर्यंत करता येणार शेतकऱ्यांना नोंदणी

राज्य शासनाकडून फळपीक विमा व खरीप, रब्बी पीक विमा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-पीक नोंदणी बंधनकारक केली आहे. यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकाचा विमा घेतलेला आहे. मात्र, फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल ॲपच्यादारे केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना शुक्रवारी 25 एप्रिलपर्यंत मुदत असून 25 एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द समजण्यात येतील.
– कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment