जळगाव : सोने-चांदीच्या किंमतीत मंगळवारी (१३ मे) रोजी पुन्हा वाढ झाली. चांदी तीन हजार ९०० रुपयांनी वधारून ९८ हजार रुपयांवर तर सोने एक हजार ५०० रुपयांनी वधारून ९४ हजार ७०० रुपयांवर पोचले. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोने-चांदीत भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण होऊनसोने तीन हजार ६०० रुपयांनी कमी होऊन ९३ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते. तसेच चांदीही दोन हजार ४०० रुपयांनी कमी होऊन २४ हजार १०० रुपयांवर आली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (१३ मे) सकाळी सोने भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९४ हजार ५०० रुपये झाले. दुपारी त्यात पुन्हा २०० रुपयांची वाढ झाली व सोने २४ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोचले.
दुसरीकडे चांदीत सकाळी तीन हजार १०० रुपयांची वाढ झाली व दुपारी पुन्हा ८०० रुपयांची वाढ झाल्याने चांदी ९८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोचली. मंगळवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८५.३० रुपयांवर पोचले. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढले असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोने कधी स्वस्त होईल?
रिपोर्ट्सनुसार, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, सोने आता ९४ हजार ते ९५ हजार रुपयांच्या दरम्यानच्या प्रतिकार पातळीला स्पर्श करू शकते. जर बाजार थोडा स्थिर झाला तर घसरण होऊ शकते. जर तुम्ही सोन्यात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा, परंतु अल्पावधीत नफा मिळवण्याची संधी आहे.