जळगाव : शहराचा पारा मागील काही दिवसांपासून वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. जळगावात दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी जळगावकरांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. चांगल्याच उन्हाच्या झळा जाणवत आहे. सरासरी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवलं जात आहे. राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर हॉट सीटी अशी ओखळ असणारं शहर म्हणजेच चंद्रपूर हे पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरात 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.
सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या जळगावकर करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल १५ ते २० अंशांचा फरक पडत असल्यामुळे अनेक जळगावकर हैराण झालं आहेत. मागील काही वर्षात जळगावातील तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता जळगावची हॉट सीटी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र उन्हाचा पारा वाढत आहे.
असा करा स्वतःचा बचाव?
पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत अ विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व पहाव्यात.
जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना पहाव्यात.