---Advertisement---

धक्कादायक! चिमुकल्यासह पती-पत्नीने घेतली रेल्वेसमोर उडी, जळगाव जिल्हयातील घटना

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्ह्यात हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यासह पती-पत्नीने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशनजवळ सोमवारी (५मे) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हयात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशनजवळ सोमवारी (५मे) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, पोलीस कॉन्स्टेबल समाधान बोरसे व जय मल्हार रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार यांच्या मदतीने तिघेही मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

पाचोरा पोलिसांनी केले आवाहन

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्यास मदत करण्याचे आवाहन पाचोरा पोलिसांनी केले आहे. मात्र, तीन वर्षांच्या चिमुकल्यासह पती-पत्नीने अशाप्रकारे आपल्या आयुष्याची दोरी का कापली? याचे कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलिसांसमोर सध्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आहे.

खूनप्रकरणी पाचव्या संशयिताला अटक

जळगाव : कालंका माता चौक परिसरात आकाश पंडित भावसार (२७, रा. अशोक नगर) या तरुणाच्या खून प्रकरणी कुणाल उर्फ चौधरी (२३, रा. कासमवाडी) या पाचव्या संशयिताला सोमवारी (५ मे) अटक करण्यात आले. रविवारी अटक केलेल्या चौघांपैकी अजय मंगेश मोरे (२८) व चेतन रवींद्र सोनार (२३) दोघे रा. कासमवाडी या दोघांना १३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर उर्वरित दोन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली.

कारच्या धडकेत पती-पत्नी जखमी

जळगाव : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे इरफान मुस्ताक अन्सारी (६१, रा. फातेमानगर) व त्यांच्या पत्नी फरजाना इरफान अन्सारी हे जखमी झाले. हा अपघात ३ मे रोजी सुप्रिम कॉलनीजवळ झाला. याप्रकरणी अन्सारी यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment