---Advertisement---
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून जिल्हा कारागृहात असलेला बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी उघडकीस आली. वेळीच इतर बंद्यांनी त्याचे पाय धरुन ठेवत त्याला खाली उतरविले. या बंद्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमधील बंदींना गळफास घेतलेल्याचा पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून त्याला खाली उतरवित त्याचा जीव वाचविला. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक ए.आर.वांढेकर, तुरुंग अधिकारी गजानन पाटील हे कारागृहातील बॅरेककडे पोहचले. त्यांनी बॅरेकमध्ये जावून बंदी अमोल सोनवणे याच्याशी चर्चा केली असता, त्याची प्रकृती सुस्थितीत होती. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. शिपाई विकास महाजन यांच्या फिर्यादीवरून बंदी अमोल उर्फ कार्तिक सोनवणे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेनैराश्येतून उचलले पाऊल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे हा 26 ऑगस्ट 2021 पासून जिल्हा कारागृहातील कोव्हीड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. 28 ऑगस्ट 2023 रोजी कारागृहातील शिपाई विकास महाजन व त्यांचे सहकारी सुरेश बडगुजर, संदीप थोरात, नितीन सपकाळे यांची रात्रपाळी ड्युटी होती. सायंकाळी सहा वाजता ते ड्युटीसाठी कारागृहात हजर झाले. 29 रोजी रात्री 12.10 वाजेच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्युटी चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोव्हीड बॅरेकमधील बंद्यांची आरडाओरड चालू झाली. त्यामुळे या सर्व जणांनी कोव्हीड बॅरेककडे धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल सोनवणे याने पांढऱ्या रंगाच्या बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.