जळगाव : खान्देशातील अग्रगण्य जळगाव जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात अध्यासी अधिकारी विशाल ठाकूर, सहाय्यक निबंधक, अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा दुपारी पार पडली. या सभेत कार्यक्रम पत्रिकेनुसार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ.
अतुल गुणवंतराव सरोदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जास सूचक विवेक रमेश पाटील व अनुम ोदक म्हणून डॉ. आरतीताई संजीव हुजुरबाजार होते. छाननी अंती अर्ज वैध असल्याने अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर यांनी डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश म दाने, संचालक मंडळातर्फे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. अतुल सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक सीए अनिल राव, केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, माजी अध्यक्ष संजय बिर्ला, संचालिका डॉ. आरतीताई हुजूरबाजार, संचालक हरिश्चंद्र यादव, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सीए नितीन झंवर, संजय प्रभुदेसाई, हिरालाल सोनवणे, सपन झुनझुनवाला, डॉ. पराग देवरे, मधुकर पाटील, सीए सुभाष लोहार, संचालिका संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती आदी मान्यवर उपस्थित होते.