जळगाव जनता सहकारी बँक, बचत गटांच्या माध्यमातून पोहचली ६० हजार घरांपर्यंत!

जळगाव : जळगाव जनता बँकेतर्फे बचत गटांसाठी तिळगुळ स्पर्धा दि. ११ रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध प्रकारचे तिळगूळ, तिळाचे प्रकार, तिळीपासून बाहुल्या, भातुकलीचे खेळ, फुलांचे बुके, पोळ्या, तिळगूळ वड्या, असे हलव्यापासून बनविलेले दागिने स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. जळगाव जनता सहकारी बँक गेल्या २० वर्षांपासून बचत गटातील महिलांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कालगुणांना वाव मिळावा, यासाठी वेगवेगळे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करीत असते. विशेष म्हणजे, बचत गटांच्या माध्यमातून जळगाव जनता सहकारी बँक ६० हजार घरांपर्यंत पोहचली आहे.

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आरती हुजूरबाजार या उपस्थित होत्या. बँकेच्या संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, संध्याताई देशमुख, तसेच प्रमुख पाहुणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सावित्री सोळून्खे बँकेच्या माजी संचालिका या  उपस्थित होत्या. स्पर्धेत सुमारे ४० महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शैलजा चौधरी मास्टर शेफ यांनी जबाबदारी सांभाळली.

डॉ.आरती हुजूरबाजार यांनी उपस्थित महिलांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. तसेच परीक्षक शैलजा चौधरी यांनी सहभागी महिलांनी क्रमांकाची अपेक्षा न करता स्पर्धेत आनंदाने सहभाग घ्यावा असे सांगितले. शोभाताई पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करताना जीवनात नैसर्गिक रित्या बनविलेल्या वस्तूंना महत्व द्यावे अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बचत गट प्रमुख वैशाली महाजन यांनी केले तर सुत्रसंचलन सुलोचना सोनवणे व आभार मनीषा आवारे यांनी मानले.

या स्पर्धेत तिळापासून बनविलेले पदार्थ
प्रथम क्रमांक योगिता कोष्टी, द्वितीय क्रमांक दीपाली कुलकर्णी, तृतीय क्रमांक वंदना पाटील यांना मिळाला तर लिना बावीस्कर व . उर्मिला काळे यांना उत्तेजनार्थ तसेच हलव्याचे दागिने – प्रथम क्रमांक कांचन राणे, द्वितीय क्रमांक – शुभांगी येवले तृतीय क्रमांक सविता जगताप यांना मिळाला तर निशा शुक्ल व योगिता घार्गे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
विजेत्या महिलांना बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले.