---Advertisement---
जळगाव, मुंबई प्रतिनिधी : जळगाव विमानतळावरून गोवा, हैद्राबाद आणि पुणे नंतर आता जळगाव -मुंबई अशी हवाई सेवा गुरुवार, २० जूनपासून सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुंबई येथे अलाएंस एयरच्या कार्यालयात पूजन करून आणि स्वत: मुंबई ते जळगाव असा प्रवास करून सेवेला प्रारंभ केला. मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवार अशा तीन दिवशी ही सेवा सुरू राहणार असून तिकीट दर 2100 रूपये आकारण्यात येणार आहे.
जळगाव ते मुंबई हवाई सेवा सुरू झाल्याने उद्योग व व्यवसाय वाढीला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच प्रवाशांना अवघ्या दीड तासातच मुंबई गाठता येणार असल्याने वेळेचीही बचत होणार असल्याचे ते म्हणाले.