Jalgaon Municipal Corporation : महापालिकेच्या पर्यावरणपुरक हळदीकूंकू स्पर्धेत चिवास महिला मंडळाने पटकाविला पहिला क्रमांक

Jalgaon Municipal Corporation :  महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे संक्रांतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या हळदीकुंकू स्पर्धेत चिवास महिला मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला.

 

महिलांनी संक्रातीला प्लॉस्टिकचे वाण न देता पर्यावरण पुरक वाण देण्याचे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यानुसार पर्यावरणपुरक हळदीकुंकवाचा कार्यक्रम करणाऱ्या महिलांकडून फोटो व माहिती मागविण्यात आली होती. याचे परिक्ष्ाण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करणसिंग राजपूत, मनपाच्या उपायुक्ता निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांनी केले.

 

यात चिवास महिला मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला.  जळगाव शहर स्तर संघाने दुसरा, त्रिमुर्ती महिला मंडळाने पटकाविला. यावेळी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड,शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे, शाखा अभियंता प्रकाश पाटील, कनिष्ठ अभियंता रसीका पाटील, पर्यावरण विभागाचे लिपीक अनिरल करोसीया, सुयश सोनटक्के, पंकज पाटील उपस्थित होते.