Jalgaon Municipal Corporation : महापालिकेच्या आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील ५४ कर्मचाऱ्यांना संक्रांतीची गोड भेट मिळाली. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते त्यांना महापालिकेत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अनुकंपा तत्वावरील कर्मचारी अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्ष्ोत होते. यातील काहीजण वयामुळे, शिक्ष्ाणामुळे तर सबंधित पदच व्यपगत झाल्याने त्यांना नियुक्ती देता आलेली नाही. मात्र शासनाच्या नविन आकृतीबंधानुसार पात्र ठरलेल्या ५४ कर्मचाऱ्यांना आज सोमवार, १५ रोजी संक्रांतीच्या दिवशी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानुसार हे ५५ जण आजपासून मनपाच्या सेवेत रूजू झाले आहेत. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, आस्थापनाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
असे आहे मनुष्यबळ
अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांमध्ये गट क मधील लिपीक : टंकलेखक २३, कनिष्ठ अभियंता ४, रचना सहाय्यक १, संगणक तंत्रज्ञ १ , वाहन चालक ५, स्वच्छता निरिक्ष्ाक १. दूरध्वनी चालक १ अशा ३६ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
तर गट ड मध्ये शिपाई १४, मालदार-चोपदार १, माळी १,मलेरीया, कुली २ अशी १८ पदे भरण्यात आली.