---Advertisement---

अखेर मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप निलंबित महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन भोवले

by team

---Advertisement---

Jalgaon News : महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्यासंदर्भातील कंत्राटी नोकरप्रकरणाचा अहवाल आस्थापना शाखेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तसेच सहकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सोमवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. विजय घोलप यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांचे अनेक कारनामे उघड होत होते. महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर त्या महिलेचा पती काम करीत होता. अनेक दिवस महिला कर्मचारी कामावर नसतांना तिचा पती त्याठिकाणी काम करीत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हा अहवाल तपासणीसाठी आस्थापना शाखेकडे पाठविला होता.

हकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन भोवले

कंत्राटी नोकरी प्रकरणानंतर डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर विशाखा समितीकडून डॉ. घोलप यांची चौकशी सुरू आहे. यात डॉ. विजय घोलप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. घोलप यांनी लेखी खुलासा टपालाद्वारे समितीकडे पाठविला होता.

आस्थापना अधिकाऱ्यांची धावपळ

सोमवारी दुपारपासून आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे हे संबंधित प्रकरणांची फाईल घेऊन आयुक्त आणि उपायुक्त यांच्या दालनात धावपळ करतांना दिसून आले. जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कंत्राटी नोकरी प्रकरण आणि महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन याप्रकरणी ठपका ठेवत सायंकाळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. विजय घोलप यांच्या निलंबनाचे आदेश काढले. या कारवाईची अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---