---Advertisement---
Jalgaon Municipal Corporation: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आमदार सुरेश भोळे यांनी स्वागत केले.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र व राज्य शासनाकडून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत काढण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही जळगाव शहरात विविध भागात 15 ते 23 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्पना यात्रा या मोहिमेअंतर्गत शहरातील सुभाष चौक येथे जळगाव शहरातील लोकांच्या कल्याणाच्या व विकासाच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. सुभाष चौक येथे विकसित भारत संकल्पना यात्रा या मोहिमेच्या चित्ररथ टेलिव्हिजन द्वारे योजना सादर करण्यात आल्यात.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी विकसित भारत यात्राचे उद्घाटन केले.
माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी महापौर सुनील खडके, माजी उपमहापौर अश्विनसोनवणे, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी सदस्य दीपक सूर्यवंशी, मुकुंद सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड , मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, अभिजीत बाविस्कर प्रभाग समिती क्रमांक एक ते चार चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, एस. एस. पाटील, संजय नेवे, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यात आली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी केले. आभार प्रदर्शन व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी केले.