---Advertisement---

Jalgaon Municipal Corporation 2025-26 Budget : मनपाचा १२४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही, पण…

---Advertisement---

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा १२४७ कोटींचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात सादर करण्यात आला. यावर्षी मनपाने गेल्या वर्षाच्या तुलनेत २३५ कोटींची वाढ करत अंदाजपत्रक तयार केले आहे. विशेष म्हणजे, कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील वर्षी करवाढ लागू होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महसूली व भांडवली लेखाशिर्षाअंतर्गत विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

विभागनिहाय तरतुदी व योजनांचा आढावा

महसूल आणि संगणकीकरण
मालमत्ता कर व पाणीपट्टीकर मॉड्युल्सचे आयजीआर प्रणालीशी एकत्रीकरण: १ कोटी
गाळाभाडे/ नुकसान भरपाई व परवाना फी प्रणालीसाठी १ कोटी
मनपा मालमत्ता संगणकीकरणासाठी १ कोटी

हेही वाचा : मधुचंद्राची रात्र; नववधूनं केलं असं काही की नवऱ्यावर आली रडण्याची वेळ

विद्युत व पर्यावरण संरक्षण
एलईडी पथदिवे लावणे, सौरऊर्जा संवर्धन प्रकल्प, चार्जिंग स्टेशन: ५.२५ कोटी
नाले स्वच्छता: २ कोटी
मूलभूत सुविधा आणि नागरी विकास
नवीन गटारी बांधणी: ६ कोटी
नवीन बगीचे उभारणी: ५० लाख
नवीन रस्ते विकास: १६ कोटी
रस्ते व्यवस्था व दुरुस्ती: ५.५० कोटी
स्वच्छतागृह व्यवस्था व दुरुस्ती: ४० लाख
गटार व्यवस्था व दुरुस्ती: ३० लाख
दिशादर्शक फलक लावणे: २५ लाख
मनपा मिळकती सर्वेक्षण व व्हॅल्यूएशन: ८० लाख
शिक्षण आणि आरोग्य
डिजिटल शाळा व दर्जा उंचावणे: १ लाख
शाळा इमारत दुरुस्ती व संरक्षण भिंत बांधणी: १.५० कोटी
औषध खरेदी, उपकरणे व श्वानदंश प्रतिबंधक लस: ३५ लाख
पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना
पाणी शुद्धीकरणासाठी: २.५० कोटी
नवीन पाइपलाइन टाकणे व दुरुस्ती: ५.५० कोटी
नवीन पोल उभारणी: १.२५ कोटी
भूसंपादन मोबदला: २१ कोटी
अमृत १.० आणि २.० योजनांचा प्रभाव

२०२५-२६ या आर्थिक वर्षात अमृत १.० मलनिस्सारण योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. यामुळे प्रत्येक घराच्या शौचालय व सांडपाणी जोडणी प्रॉपर्टी चेंबरला जोडण्यात येणार आहे. मलप्रवाह कर आणि जोडणी शुल्क लागू होणार आहे.

पाणीपुरवठा उत्पन्न

२०२४-२५ मध्ये ३६.३८ कोटी
२०२५-२६ मध्ये अपेक्षित उत्पन्न ४६.५८ कोटी
अमृत २.० अंतर्गत

१००% ग्राहक मीटर जोडणी
स्कॅड ऑटोमेशन प्रणालीचा समावेश
महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढीची अपेक्षा

यंदा पाणीपुरवठा व नळजोडणीमधून महसूलात मोठी वाढ अपेक्षित आहे. मनपाने प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून महसूल संकलन वाढवण्यावर भर दिला आहे.

शहरवासींना दिलासा, पण भविष्यात करवाढीचे संकेत

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, पुढील वर्षी करवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मनपाच्या वित्तीय धोरणाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment