---Advertisement---

Jalgaon News : आता जळगावकरांची थांबणार फरपट, मनपाने घेतला ‘हा’ निर्णय

---Advertisement---

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात दाखले लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. दाखल्यांसाठी नागरिकांना महापालिकेत खेटे मारावे लागत आहेत. नागरिकांची होणारी ही फरपट लक्षात घेता महापालिका प्रशासनाने वाढीव कर्मचारी नियुक्तीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच पेण्डिंग कामासाठी या निर्णयानुसार आता शनिवारी व रविवारी महापालिकेचा जन्म-मृत्यू विभाग सुरू राहणार आहे. यातून कामाला गती मिळणार आहे.

महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर जन्म-मृत्यू नोंदीसाठी आरोग्य विभागाकडे जबाबदारी आहे. दवाखाना विभागातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर येथे निबंधक म्हणून कामकाज पाहतात. वर्ष २०१८ पूर्वी हे संपूर्ण कामकाज ऑफलाइन पद्धतीने हाताळले जात होते. उपलब्ध नोंदीनुसार अत्यल्प फी आकारून महापालिकेतर्फे जन्म आणि मृत्यूबाबतचे दाखले देण्यात येत होते. मात्र, सन २०१८ नंतर ऑफलाइन नोंदणीचे कामकाज थांबवून शासनाच्या विशिष्ट ऑनलाइन करण्यात सॉफ्टवेअरद्वारे पद्धतीने नोंदी येऊन बारकोड असलेले दाखले देण्यात येतात. सकाळी दहापासून ते सायंकाळी सातपर्यंत या विभागात लांबचलांब रांगा लागलेल्या असतात. दिवसाला किमान सातशेच्यावर दाखले या विभागातून दिले जातात. तसेच नाव दुरुस्तीचे दाखलेही वितरित केले जातात.

दरम्यान, मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील चार कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था न करताच बदली करण्यात आली आहे. या विभागात केवळ एकच कर्मचारी कार्यरत आहे. या एकाच कर्मचाऱ्यावर जळगावातील साडेपाच लाख नागरिकांच्या जन्म मृत्यू नोंदणीची जबाबदारी येऊन ठेपली आहे. यामुळे नागरिकांना नियमित कालावधीत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (११ मार्च) नागरिकांची लांबचलांब रांग लागलेली होती. यात दुपारी एकच्या सुमारास गोंधळ निर्माण झाल्याने सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड तत्काळ जन्म मृत्यू नोंदणी विभागात दाखल झाल्या. या वेळी त्यांनी जन्म-मृत्यू नोंद विभागाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी उद्याच वाढीव तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येतील अशी माहिती दिली. त्यांनी तत्काळ एका वरिष्ठ लिपिकास या विभागात मदत करण्याचे आदेश दिले.

फक्त या कामांसाठी शनिवार, रविवारी सुरू राहणार विभाग

जळगावची लोकसंख्या पाच लाखांच्या वर आहे. शहरात जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाण लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात दाखले प्रलंबित राहतात. सद्यःस्थितीत जवळपास १२०० पेक्षा अधिक दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेत दाखले वितरित करण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. ही समस्या लक्षात घेता मनपाने शनिवारी. रविवारी जन्म-मृत्यू नोंदणी विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी, रविवारी फक्त प्रलंबित दाखल्यांसंबंधितच कामकाज होईल. नवीन नोंदणी शनिवारी, रविवारी होणार नाही. असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment