---Advertisement---
जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग रचना अंतीम झाली असून गुरूवारी ९ रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. दरम्यान आरक्षणाबाबत अद्याप महापालिकेस कुठलेही नवीन आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वत्रिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावर हरकती व सूचना ३ ते १५ सप्टेंबर पर्यंत मागविण्यात येऊन ७० हरकती आल्या होत्या. तर १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन तो अहवाल विभागीय कार्यालयव निवडणूक विभागाला सादर केला होता. निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
त्यानुसार जळगाव महापालिका प्रशासन महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाबाहेर दुपारी १२ वाजता नागरिकांना पाहण्यासाठी लावणार आहे.प्रारूप प्रभाग रचनेत काही प्रभागांचे सीमांकन बदलले गेले असून, काही प्रभागांचे विलीनीकरण तर काहींचे विभाजन करण्यात झाले असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही प्रभागात बदल झाल्याने उमेदवारांचे गणीत बिघडले आहे. त्यामुळे आलेल्या हरकती व झालेल्या सुनावणीतून अंतिम प्रभाग रचनेत काय बदल होतो? हे उत्स्कुतेचे ठरणार आहे.