जळगाव : गुरुवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माची गोष्ट व त्यांच्या बाललीला ह्या कार्यक्रम प्रमुख अनिता बोरोले यांनी सांगितल्या. तसेच श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरती ही विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, विभाग प्रमुख कल्पना बावस्कर व उपस्थित पालक यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी “हरी हा कांबळी घोंगडीवाला” हे गाणे रोहिणी कुलकर्णी यांनी म्हटले . ज्युनि. के.जी. च्या विद्यार्थ्यांनीनीं “मैया यशोदा” या गाण्यावर नृत्य सादर केले. नंतर गोपालकाल्याचे महत्व व तो कसा तयार होतो हे सांगून सिनि. के.जी. च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. सगळ्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, गोप व गोपिका यांच्या वेशभूषा केल्या असता जणू गोकुळ नगरीत अवतरली आहे असे वातावरण झाले होते.
कन्हैयाच्या जय जय कारात व गोपालकाल्याच्या प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी दही घुसळून ताक तयार करणे व गोपालकाल्यात कुठले पदार्थ घातले जातात याची माहिती मिळवणे हे उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रम हा अविस्मरणीय झाला व आम्हालाही आनंदाचे क्षण अनुभवता आले. अशा प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी दिल्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.