डॉ. पंकज पाटील
jalgaon : राज्यभरातील नेटसेट व पीएचडीधारकांनी स्वतंत्रपणे लढण्याऐवजी अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघात सहभागी व्हावे. त्यामुळे यूजीसीसह सरकारला निर्णय घेणे सोपे होणार आहे. असे मत एन.मुक्तो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन बारी यांनी ‘जळगाव तरुण भारत लाईव्ह’शी संवाद साधताना व्यक्त केले.
संस्थेच्या कार्याची माहिती देताना प्रा.बारी म्हणाले की, 2010 मध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांनी एन मुक्तो नावाची संघटना स्थापन केली. हे ऑल इंडिया नॅशनल एज्युकेशन फेडरेशनशी संलग्न आहे. या माध्यमातून प्राध्यापकांना भेडसावणाऱ्या विविध स्तरावरील अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. एज्युकेशन फेडरेशन आणि एन.मुक्तो संस्थेचे काम सुरू आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन समाज आणि शिक्षक यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
भ्रष्टाचारमुक्त शिक्षक संघटना
एन. मुक्तोतर्फे मी विद्यापीठ प्राधिकरणाची निवडणूक लढवली आणि जिंकलो. इतर संस्थांच्या सहकार्याने व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून काम करणे. भ्रष्टाचारमुक्त शिक्षक संघटना कशी असते हे प्रत्यक्ष कामातून सिद्ध होत आहे.
सरकारचे उदासीन धोरण
उच्च शिक्षणाबाबत राज्य सरकार उदासीन आहे. उच्च शिक्षणमंत्री किंवा शिक्षण सचिव यांची भेट घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उच्च शिक्षणाकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. ही खंत आहे.
प्राध्यापकांच्या रिक्त जागा
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. 2017 ते 2023 या कालावधीत अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता भरती करताना 2023 मधील रिक्त पदांचा विचार करावा.
नेटसेट, पीएच.डी.ची वाढती संख्या
आता महाविद्यालयातील प्राध्यापकांची संख्या पाहिली तर परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. नेटसेट, पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या सर्वांना या रिक्त पदांवर नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे.
तासिका तत्त्वावर मोबदला
सध्या तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. त्यांचा पगारही कमी होतो. यासंदर्भात संस्थेने सरकार आणि यूजीसीकडे पाठपुरावा करून त्यात वाढ केली. काही महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवताना काही त्रुटी काढाव्यात. काही महाविद्यालयांमध्ये खऱ्या अडचणी आहेत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष
प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासोबत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष्ा देत असल्याचेही एन मुक्टोचे अध्यक्ष् प्रा. नितीन बारी यांनी सांगितले.