jalgaon newes: कथा श्रवण करा, मात्र तुमचे दागिने तुम्हीच सांभाळा!

जळगाव,  पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला जाताना महिलांनी अंगावर दागिने घालून जायलाच नको, असे आवाहन आयोजकांसह पोलिसांनी वारंवार केले. परंतु महिला दागिने परिधान करुन याठिकाणी येताना दिसत आहेत. त्यामुळे मंडपात भाविक महिलांनी कथा जरुर श्रवण करावी, त्याबरोबरच आपले दागिने सांभाळण्याची गरज आहे.

कथेच्या पहिल्याच दिवशी दोन ते तीन महिलांची मंगलपोत लंपास झाल्याचे समोर आले. तर पोलिसांनी एका संशयितासह तब्बल 27 संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यामुळे लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये मंगलपोत चोरटे जागोजागी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भाविक असल्याची बतावणी करत ते मंडपात बसून त्यांचा चोरीचा उद्देश तडीस नेण्याचा प्रयत्न करु शकतील. त्यांचा चोरीचा उद्देश मोडून काढण्यासाठी भाविक महिलांनी एक दागिने अंगावर घेवू नये ही एक चांगली सुरक्षितता ठरु शकते. आणि जर महिला दागिने परिधान करुन आल्या असतील तर या दागिन्यांची सुरक्षा स्वत:च महिलांनी करण्यासाठी सजग, सावध असणे अधिक योग्य  ठरु शकेल.