जळगाव : लोकसभा निवडणूक . २०२४ मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले गरोदर महिला आणि प्रसुती रजेवरील महिलांना सूट देण्यात यावी. तसेच वय वर्षे ५५ वयावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष पदाचे काम न देता मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीनची कामे देण्यात – येऊन त्यांच्या कामाचा भार हलका न करण्यात यावा, अशी मागणी शनिवार, ६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना द समितीच्या माध्यमातून निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यातील तापमानाचा वाढता पारा पाहता कर्मचारी वर्गाला तसेच वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना विविध व्याधींचा सामना करावा लागत असतो. बहुतेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या सुरू असतात. वाढत्या तापमानात काम समन्वयाचा ताण होणारी धावपळ व दगदग तसेच तांत्रिक टेक्निकल बाबींशी संबंध पाहता त्यांना अडचणी येऊ शकतात.यामुळे केंद्राध्यक्ष पदाऐवजी अशा ५५ वर्षे वयावरील व्यक्तींना म तदान अधिकारी क्रमांक एक दोन, तीन अशा जबाबदारीची कामे दिलीजावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी भुसावळ पूर्व विभाग सोसायटीचे संचालक तथा समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस. नेमाडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, सम न्वयक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते.